शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 3 मार्च 2022 (21:28 IST)

जेष्ठ नागरिकाला वाईन पडली नऊ लाखाला, सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

Senior citizen gets Rs 9 lakh worth of wine
पुण्यात ऑनलाइन वाइन मागवणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल नऊ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. वाइन खरेदीचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी ओटीपीची मागणी करून ही फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन मोबाइलधारक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पुण्यातील औंध येथील हि घटना असून विशेष म्हणजे एकदा फसवणूक झाल्यानंतरही त्यातून धडा न घेता त्यांनी केलेले पैसे परत मिळवण्यासाठी पुन्हा ओटीपी दिला. त्यातून चोरट्याने तब्बल आठ लाख ९६ हजार ९४८ रुपयांना गंडा वृद्धाला घातला. या प्रकरणी औंध मध्ये राहणाऱ्या एका ६४ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
 
दरम्यान हा प्रकार १५ मे ते १७ मे २०१९ रोजी घडला फिर्यादी यांनी त्यांच्या राहत्या घरात जवळील वाईन शॉप मधील वाईन मिळवण्यासाठी गुगल सर्च केले. त्यावेळी औंधला आनंद पार्क येथील एक वाईन शॉप ची माहिती त्यांना मिळाली. त्यावर असलेल्या मोबाईल क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला असता समोरील व्यक्तीला घरपोच वाईन हवी असल्याबाबत सांगितले. त्यावेळी समोरील व्यक्तीने त्यांचा विश्वास संपादन करून व्यवहार पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ओटीपी लागणार असल्याचे सांगितले.
 
यानंतर त्यांच्या क्रेडिट कार्डवरून ४८ हजार एकशे दहा वाईन खरेदी केली. मात्र खरेदी केलेली वाईन त्यांना घरपोच आली नाही. ती रक्कम परत मिळवण्यासाठी पुन्हा त्या क्रमांकावर संपर्क साधला असता त्यावेळेस समोरील व्यक्तीने त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या खात्यात पैसे पाठवण्यासाठी बँक खात्याची माहिती घेतली. यावेळी या खात्यातून पुन्हा आठ लाख ४८ हजार ८३८ रुपये काढून घेतले.