बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 12 डिसेंबर 2021 (17:03 IST)

लज्जास्पद ! लाडीगोडी लावून काकाने 7 वर्षाच्या पुतणीवर बलात्कार केला

पुण्याच्या हडपसर येथे एक धक्कादायक आणि लज्जास्पद प्रकार घडला आहे. येथे नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. इथे एका नराधम काका ने आपल्या 7 वर्षाच्या पुतणीवर लैंगिक अत्याचार केले आहे. आणि असं तो गेल्या सहा महिन्यापासून करत असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी एका महिलेने आपल्या 22 वर्षाच्या दीराच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद केली आहे. पोलिसांनी दिराला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मांजरीतील एका सोसायटीत एक नराधम आपल्या 7 वर्षाच्या पुतणीला लाडीगोडी लावून तिचावर लैंगिक अत्याचार करायचा . जून2021 पासून हा प्रकार सुरु होता. कोणाला सांगितले तर तुझ्या वडिलांना मारून टाकेन असं म्हणत आणि धमकवत तो तिच्यावर अत्याचार करायचा. नंतर तिला त्रास होऊ लागल्याने तिने आपल्या आईला हे सर्व घडलेले 6 डिसेंबर रोजी  सांगितले. हे कळतातच आईचा थरकाप झाला. तिने ताबडतोब हडपसर पोलिसांकडे धाव घेऊन त्यांना घडलेले सांगितले. पोलिसांनी नराधम दिराला अटक केले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.