शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 11 डिसेंबर 2021 (15:16 IST)

पुण्यात दरोडा दरोडा टाकणारे सहा आरोपी नेवाशातून जेरबंद

आळेफाटा(पुणे) येथील बोरी बुद्रुक येथील अविनाश पटाडे यांचे नगर-कल्याण रोडवरील साई इलेक्ट्रॉनिक्सचे दुकानात दरोडेखोरा प्रवेश केला होता.
त्यानंतर पटाडे यांना बंदुकीचा धाक दाखवून दुकानातील रोख १८ हजार रुपये, मोबाईल व दुचाकी चावी घेऊन हे चोरटे पसार झाले होते. काही दिवसांपूर्वीच चौदा नंबर येथील अनंत पतसंस्थेवर भर दुपारी दरोडा पडला होता.
त्यामध्ये पतसंस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र भोर यांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा तपास अद्याप सुरु असताना ह्या चोरीने जुन्नर तालुक्यात खळबळ माजली होती.
त्यानंतर ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊ चौकशीचे आदेश दिले होते. या गुन्ह्याच्या तपासासाठी ग्रामीण पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली होती.
ही पथके तपास करत असताना त्यांना आरोपी बँड-डीजे व्यवसायाशी संलग्न असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. पोलिसांनी त्यादिशेने तपास सुरु ठेवला.
गुप्त बातमीदाराच्या बातमीच्या आधारे त्यातील सहा आरोपींना अवघ्या ७२ तासात अहमनगर जिल्यातील नेवासा तालुक्यातून अटक केली. हृषीकेश बळवंत पंडीत (वय २२, रा. खरंडी, ता.नेवासा),
अरबाज नवाब शेख (वय २०, रा. वडाळा व्हेरोबा, ता. नेवासा), वैभव रविंद्र गोरे (वय २१, रा. खरवंडी, ता. नेवासा), राहुल राम चव्हाण (वय २०, रा. खरवंडी, ता. नेवासा),
शुभम बाळासाहेब शिंदे (वय २१, रा. खरवंडी ता. नेवासा) आणि प्रकाश विजय वाघमारे (वय २०, रा. माळी चिंचोरा ता. नेवासा) अशी आरोपींची नावे असल्याचे पत्रकार परिषदेत अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी सांगितले.