सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 (23:21 IST)

किरीट सोमय्यांना मारहाण करणारा शिवसैनिक गजाआड

भाजप नेते किरीट सोमय्यां शनिवारी पुणे आले असता शिवसैनिकांकडून धक्काबुक्की करण्यात आली होती. त्यात किरीट सोमय्या पायऱ्यांवरून घसरून पडले होते. त्यात त्यांना दुखापत झाली होती. दरम्यान किरीट सोमय्यां यांना एका शिवसैनिकानी शर्ट काढून मारले होते. शर्ट काढून सोमय्यांना मारणाऱ्या त्या शिवसैनिकाला पोलिसांनी अटक केले आहे. 
 
किरीट सोमय्यां यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यांच्यासह 60 ते 70 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात अद्याप पोलिसांनी एकही आरोपींना अटक केले नव्हते. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची दोन पथके पाठवण्यात आल्याचे शिवाजी नगर पोलिसांनी सांगितले होते. आज या प्रकरणात एका शिवसैनिकाला अटक करण्यात आली आहे. सनी गवते असे अटक केलेल्या शिवसैनिकाचे नाव आहे. 
 
सनी गवते या शिवसैनिकाने किरीट सोमय्यां पायऱ्यांवरून खाली पडल्यावर स्वतःची शर्ट काढून त्यांना मारण्याच्या प्रयत्न केला होता. हा सर्व प्रकार व्हिडिओमध्ये दिसून आला. या व्हिडिओमध्ये पाहता शिवाजीनगर पोलिसांनी सनी गवते याला अटक केली असून कोर्टात हजर केले होते. न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर करून सोडण्यात आले आहे.