शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 6 फेब्रुवारी 2022 (17:56 IST)

ढाक बहिरीच्या सुळक्यावरून पडून ट्रेकरचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील राजमाची किल्ल्याजवळ असलेल्या ढाक बहिरीच्या सुळक्यावरून पडून एका ट्रेकरचा मृत्यू झाला. शनिवारी ही दुर्देवी घटना घडली. प्रतीक आवळे रा. औरंगाबाद असे या मयत झालेल्या ट्रेकरचे नाव आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळा जवळ कर्जत आणि मावळ तालुक्यात मध्यावर ढाक -बहिरी हा उंच सुळका आहे. या किल्ल्यावर ट्रेकिंग साठी प्रतीक आणि त्याचे साथीदार औरंगाबादहून आले होते. ढाक बहिरीच्या सुळक्यावरून तोल जाऊन प्रतीक खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला. 
घटनेची माहिती मिळाल्यावर स्थानिक गावकरी आणि हायपर्स खोपोलीची टीम ढाक बहिरीच्या सुळक्या जवळ पोहोचली. अथक प्रयत्नानंतर प्रतीकचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.