बुधवार, 12 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 4 जानेवारी 2022 (14:48 IST)

धक्कादायक : पोलिसानेच केले महिला वकिलावर बलात्कार

Shocking: Police rape female lawyer
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण पोलीस दलात काम करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यानं 29 वर्षीय महिला वकिलावर बलात्कार (woman lawyer raped by police) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी राऊत याची एका मेट्रोमोनिअल साइटवरून फिर्यादीशी ओळख झाली होती. या संकेतस्थळावर संवाद साधल्यानंतर आरोपी राऊत याने पीडित महिलेचा मोबाइल नंबर घेतला होता. यातूनच त्याने संवाद साधत पीडितेशी ओळख वाढवली. यानंतर लग्नाचं आमिष दाखवून आरोपीनं पीडित महिलेवर वेळोवेळी लैंगिक शोषण केलं आहे.
 
आरोपीनं पीडित महिला वकिलाला देहूरोड, पिंपळे निलख परिसरातील विविध लॉजवर घेऊन जात तिच्यावर अनेकदा बलात्कार केला आहे. गेल्या पावणे दोन वर्षांपासून लैंगिक संबंध ठेवल्यानंतर आरोपीनं पीडित महिला वकिलाशी लग्न करण्यास नकार देत, तिची फसवणूक केली आहे. या प्रकारानंतर पीडित वकिलानं चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात जात, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण राऊत विरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.