शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 23 एप्रिल 2022 (21:21 IST)

दुर्दैवी घटना, वडाचे झाड पडून नवविवाहित जोडप्यासह लहान भाचीचा मृत्यू

death
पुण्यातल्या पुरंदर येथे अवकाळी पाऊस आणि जोरदार वारा यामुळे वडाचे झाड पडून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना  पुरंदर येथील सासवड वीर मार्गावर घडली. या अपघातात नवविवाहित जोडप्यासह लहान भाचीचा मृत्यू झाला. जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. यावेळी अंगावर वडाचे झाड पडून नवविवाहित जोडप्यासह लहान मुलीचा बळी गेला. या दुर्घटनेत सात वर्षांची त्यांची भाची गंभीर जखमी झाली होती. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 
पावसामुळे वडाचे झाड अंगावर पडल्याने रेणुकेश जाधव आणि त्यांची पत्नी सारिका जाधव याचा मृत्यू झाला. तर सोबत असलेल्या सात वर्षांची भाची ईश्वरी देशमुख हिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. पाऊस पडत असताना हे तिघे आपल्या घरी जात होते. या दांपत्यावर पिंपळे गावाच्या जवळ अर्धवट झळालेले वडाचे झाड अंगावर पडून दुर्दैवी मृत्यू ओढावला. मृत्यू झालेल्या ईश्वरीचा  वाढदिवस होता तर रेणुकेश आणि सारिका यांचा नुकताच विवाह झाला होता.