शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : मंगळवार, 9 एप्रिल 2024 (13:25 IST)

काय सांगता, पुण्यात सामोस्यात निघाले दगड, कंडोम आणि गुटखा

महाराष्ट्राच्या पुण्यातून एक धक्कादायक बातमी आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात एका नामांकित ऑटोमोबाइलच्या कंपनीच्या कॅन्टीनच्या समोस्यांत चक्क कंडोम, दगड आणि गुटखा आढळून आले. ही घटना 27 मार्च रोजी घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाला अटक केली आहे. 
त्यात उपकंत्राटदार कंपनीचे दोन कर्मचारी यांचा समावेश आहे. तसेच उर्वरित तीन आरोपी फर्मचे भागीदार होते. ज्यांना भेसळीच्या आरोपाखाली काढून टाकण्यात आले होते. 
 
कॅटॅलिस्ट सर्व्हिस सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या ऑटोमोबाईल फर्मच्या कॅन्टीनमध्ये खाद्यपदार्थ पुरवण्याची जबाबदारी कंत्राट मनोहर एंटरप्रायझेस नावाच्या कंपनीला दिले होते. शनिवारी ऑटो फर्मच्या काही कर्मचाऱ्यांनी समोस्यांमध्ये कंडोम, गुटखा आणि दगड सापडल्याची तक्रार केली होती.
चिखली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मनोहर एंटरप्रायझेसच्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता फिरोज शेख आणि विकी शेख नावाच्या दोन कर्मचाऱ्यांनी कंडोम, गुटखा आणि दगडाने समोसे भरल्याचे निष्पन्न झाले. एसआरएस एंटरप्रायझेसच्या भागीदारांची रहीम शेख, अझहर शेख आणि मजहर शेख अशी नावे आहेत. फिरोज शेखला पोलिसांनी अटक केली आहे. 

पोलीस तपासात एका व्यावसायिकाने स्पर्धेच्या ईर्ष्येतून हा प्रकार घडवला असल्याचे समोर आले आहे. 
झाले असे की एका नामवंत कंपनीच्या कॅन्टीन मध्ये खाद्यपदार्थ पुरवण्याचा करार कीर्तिकुमार देसाई यांच्या कंपनी सोबत झाला असून देसाई यांची कंपनी मोरवाडीच्या में. एस आर एस इंटरप्राइझेस या कंपनी कडून खाद्यपदार्थ घेत होती. याचा करार झाला होता मात्र या खाद्य पदार्थामध्ये या पूर्वी देखील समोशात प्रथमोपचार पट्टी आढळली होती. या वरून देसाई कंपनीकडून करार रद्द करण्यात आला होता.

नंतर मनोहर एन्टरप्राइझेसला कंत्राट देण्यात आला होता. वचपा काढण्यासाठी एसआरएस या कंपनीने देसाईंच्या कंपनीची प्रतिमा खराब करण्यासाठी आणि कंपनीसह आपला करार संपुष्टात आल्यानंतर नवीन कंत्राटदाराकडून केटरिंगचा कंत्राट मिळवण्यासाठी एसआरएसचे मालक यांनी हे कृत्य केले. आणि फिरोज शेख आणि विकी यांना मनोहर एन्टरप्राइझेस मध्ये काम करायला पाठवले. त्यांनी समोसे तयार करताना त्यात दगड, कंडोम गुटका असे पदार्थ टाकले होते. ते आढळल्यावर कंपनीत खळबळ उडाली. पोलिसांनी प्रकरणाचा शोध घेतला असता त्यांनी फिरोजला अटक केली आहे. 
 
 Edited by - Priya Dixit