रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. पंजाबी ढाबा
Written By

बिटाचा पराठा

साहित्य : मध्यम आकाराचे एक बीट, चमचाभर तीळ, तीन-चार हिरव्या मिरच्या भरडसर वाटलेल्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, मोठा चमचा तेल, चिमूटभर साखर, चवीप्रमाणे मीठ, हळद, हिंग.
 
कृती : बीट बारीक किसणीने किसून घ्या. त्यात तीळ, हळद, हिंग, मीठ, साखर, तेल, वाटलेली मिरची, कोथिंबीर घालून कालवून घ्या. त्यात मावेल तेवढी कणीक घाला. थोडे-थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या. साधारण पाच वाटी पाणी त्याला पुरते. भिजवलेली कणीक थोड्यावेळ झाकून ठेवा. नंतर या पिठाचे पातळ पराठे लाटा. ते मध्यम आचेवर तूप सोडून भाजून घ्या. या पराठ्यासोबत दही देऊन सर्व्ह करा.