गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. पंजाबी ढाबा
Written By वेबदुनिया|

मक्याची पोळी

साहित्य : 300 ग्रॅम मक्याचे पीठ, 1/2 कप तूप किंवा लोणी, 1 चिमूट मीठ, गरम पाणी. 
 
कृती : पिठात मीठ मिळवा आणि गरम पाणी टाकून नरम चुरून घ्या. चुरलेल्या पिठाचे उंडे बनवा आणि ओल्या हाताने थापून गोल पोळी बनवून गरम तव्यावर दोन्हीकडून कुरकुरीत शेकावे. शेकलेली पोळीवर लोणी लावून सरसोच्या भाजीसोबत गरम गरम वाढावे.