बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. रेल्वे बजेट 09
Written By वार्ता|
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 13 फेब्रुवारी 2009 (16:22 IST)

लालूंनी उलगडले यशस्वितेचे मर्म

कुशल व्यवस्थापन व काम करण्याची वैशिष्ट्यपूर्ण पद्धत यामुळे रेल्वेला नफ्यात आणणारे रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव जगभरातच चर्चेचा विषय ठरले आहेत. आपल्या यशस्वीतेचे मर्म आज लालूंनी उलगडून दाखवले.

केवळ प्रवासी भाडे कमी करून व मालभाड्यात कपात करून यशस्वी होता येत नाही, हे सांगून लालू म्हणाले, की यशस्वी होण्याचे कारण एकच आहे. ते म्हणजे लोकांच्या गरजा पूर्ण करून त्यांचे ह्रदय जिंकणे. तेही प्रतिस्पर्ध्यापेक्षा चांगले. तेही रोज आणि दरवर्षी. तरच आज जे साध्य केले ते करता येईल.

लालूंनी आपल्या कार्यपद्धतीमुळे रेल्वेत झालेल्या बदलांकडेही लक्ष वेधले. तोट्यात असणारी रेल्वे आता नफ्यात आली आहे. रेल्वेच्या कार्यपद्धतीतच बदल घडला आहे. रेल्वे आता पूर्वीपेक्षा अधिक लोकाभिमुख झाली आहे हे सांगून लालू म्हणाले, लोकांना आता घरपोच तिकीटे मिळू लागली आहेत. या सगळ्या कल्पनांच्या जोरावरच रेल्वेने दरवर्षी नफ्याची नवनवी क्षितिजे गाठली आहेत. पाच वर्षांत सामान्य माणसावर कोणताही बोजा न घालता रेल्वेच्या उत्पन्नात ९० हजार कोटीचे उत्पन्न मिळविण्याचा विक्रम म्हणूनच रेल्वे करू शकली.