अर्थसंकल्प बिहारसाठी की भारतासाठी?
आपल्या सहाव्या हंगामी रेल्वे अर्थसंकल्पात लालूंचे बिहार प्रेम पूर्णपणे दिसून आले. गेल्या प्रत्येक बजेटमध्ये ते केवळ बिहारचेच रेल्वे मंत्री आहेत की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आपल्या सरकारच्या शेवटच्या हंगामी अर्थसंकल्पातही त्यांनी आपल्या मतदार संघाला भरभरून देण्याचा प्रयत्न केला आहे. यंदाच्या हंगामी अर्थसंकल्पातील प्रत्येक मोठ्या घोषणेस 'बिहारी टच' होता. नवीन रेल्वे गाडी सुरू करण्याचा विषय असो कि रेल्वेशी संबंधित एखादी फॅक्ट्री लालुंची प्रत्येक घोषणा खास बिहारसाठीच होती. बिहारमधील मढ़ौरा आणि लालूचा मतदार संघ मोपुरात इलेक्ट्रिक इंजिन फॅक्ट्री सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर ज्या 43 नवीन गाड्या सुरू करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला त्यापैकी 12 गाड्या बिहारमधूनच चालणार आहेत. एवढ्यावरच न थांबता लालूंनी बिहारला बुलेट ट्रेन चालविण्याचे स्वप्न दाखवित दिल्ली ते पाटणा दरम्यान चालविण्याचे घोषीत केले.