मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. रेल्वे बजेट 09
Written By वार्ता|

भाड्यात कपातीपोटी ७०० कोटींचा भार

संसदेत आज सादर करण्यात आलेल्या रेल्वेच्या अंतरीम बजेटमध्ये प्रवासी भाड्यात दोन टक्के कपात करण्यात आल्याने रेल्वेला ७०० कोटींचा भार पडणार आहे.

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष एस. एस. खुराना यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रवाशांना दिलेली सवलत एक एप्रिलपासून लागू होईल. रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी सर्व रेल्वेगाड्यांच्या भाड्यात दोन टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे.