शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रपती निवडणूक
Written By
Last Updated : रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (22:36 IST)

राष्ट्रपती पदासाठी शरद पवारांना काँग्रेसचा पाठिंबा- प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

nana patole
मुंबई :कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक महत्वाचे विधान केले. पत्रकारांनी राष्ट्रपती उमेदवारीसाठी शरद पवार यांच्या नावाची चर्चा असल्याचे छेडले असता, जर शरद पवार या पदासाठी उभे असतील तर राष्ट्रीय कॉंग्रेसचा त्यांना पुर्ण पाठींबा असेल असे सांगितले.
 
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ लवकरच संपत आहे. राष्ट्रपती कोविंद यांच्या रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक लागणार असून त्यासाठी राजकीय पक्षांनी आत्ताच मोर्चेबांधणी करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणूकांनंतर संपूर्ण देशाचे लक्ष राष्ट्रपती निवडणूकीकडे लागले असतानाच राष्ट्रीय कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उमेदवारीला कॉंग्रेसचा पाठींबा असल्याचे सांगितले आहे.