शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 13 ऑक्टोबर 2016 (10:16 IST)

अल्पवयीन मुलीवर शेजारील ड्राईवरचा बलात्कार

पुण्यातील खडकीमध्ये 15 वर्षीय मुलीचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. खडकी पोलिस स्टेशनमध्ये 35 वर्षीय राकेश शिंदे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना 30 सप्टेंबर रोजी घडली.  आरोपी पसार झाला आहे. पीडित मुलगी आरोपी राकेश शिंदे याच्या शेजारीच राहत होती. राकेश शिंदे विवाहित असून तो ड्रायव्हर म्हणून काम करतो. 
 
आरोपीने त्या घरी जाऊन मुलीचं अपहरण केलं. तिला निर्जन स्थळी घेऊन गेला. मारहाण करुन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो तिथून पसार झाला आहे. खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.