'आदर्श' चौकशी अहवाल शासनाच्या संकेतस्थळावर
बहुचर्चित ‘आदर्श गृहनिर्माण सोसायटीच्या घोटाळ्याचा चौकशी अहवाल अखेर शासनाच्या वेबसाईटवर टाकण्यात आला आहे. या अहवालामुळे काँग्रेसचे तीन माजी मुख्यमंत्री अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हा अहवाल हिवाळी अधिवेशनात सरकारने फेटाळला होता. पण भ्रष्टाचार्यांना पाठीशी घालण्याच्या राज्य सरकारच्या या निर्णयाने देशभर काहूर माजले आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही या चौकशी अहवालबाबत पुनर्विचार करा, अशी सूचना दिल्या होत्या. पक्षनेतृत्वाच्या या सूचनेनंतर मुख्यमंत्री चव्हाण यांची मोठी राजकीय कोंडी झाली होती. त्यामुळे जे.ए.पाटील चौकशी समितीचा हा अहवाल स्वीकारण्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नसल्याने अखेर या अहवालाला शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करून त्यांनी तो सार्वजनिक केला आहे. चौकणी अहवालाचे दोन्ही भाग शासनाच्या https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आले आहे.