मंगळवार, 19 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: जयसिंगपूर , गुरूवार, 26 मे 2016 (14:32 IST)

महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने राज्यातील २८ मान्यवरांना विविध पुरस्कार जाहीर

(कवितासागर वृत्तसेवा) महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने राज्यातील ग्रामीण  पत्रकारांचा स्नेहमेळावा रविवार दिनांक २९ मे २०१६ रोजी सकाळी १० वाजता सांगोला बस स्थानकाजवळील अजिंक्य प्लाझा येथे आयोजित करण्यात आला असून या वेळी राज्यातील नामवंत पत्रकार आणि विविध क्षेत्रातील आदर्श योगदान देणा-या सेवाभावी व्यक्तींना पत्रकार भुषण व अन्य विविध प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची माहिती स्नेहमेळाव्याचे संयोजन राज्य पत्रकार संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रशांतकुमार मोहिते यांनी दिली.

महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या दशकपूर्ती सोहळा व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभासाठी समारंभ अध्यक्ष म्हणून विद्यमान आमदार गणपतराव देशमुख हे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यमान खासदार - विजयसिंह मोहिते-पाटील, श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्राचार्य - अभयकुमार साळुंखे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. ता. भोसले, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष - विद्यमान आमदार सदाशिवराव पाटील आणि माजी आमदार दीपकआबा साळुंखे - पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रात आदर्श योगदान देणा-या एकूण २८ मान्यवरांना विविध पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. कै. बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्काराने पुणे येथील सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार खलील खान यांना, तर कै. यशवंत पाध्ये पुरस्काराने कराड येथील दैनिक प्रीतिसंगमचे संपादक शशिकांत पाटील यांना गौरविण्यात येणार आहे.

मोहन म्हस्के (सांगोला), प्रमोद सुकरे (कराड), सतीश सावंत (सांगोला), साप्ताहिक कवितासागरचे कार्यकारी संपादक - मंगेश विठ्ठल कोळी (शिरोळ), आणि अशोक उध्यावर (पालघर) या पाच पत्रकारांना पत्रकार भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

गिरीश नष्टे (सांगोला), डॉ. शिवाजीराव ढोबळे (बलवडी), जयसिंग गायकवाड (त्रीशुर), अरुण बोत्रे (सांगोला), आणि अशोक दत्तात्रय सकपाळ (खेड) या पाच मान्यवरांना समाज भुषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

रामचंद्र दादा जरे (आटपाडी), प्रविणकुमार जगताप (कराड), आणि राजेश रामराव सातारकर (आटपाडी) या तीन मान्यवरांना उद्योगश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

सातारा येथील प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ यांना जीवनगौरव पुरस्कार, बारामतीचे तहसीलदार निलप्रसाद चव्हाण यांना उत्कृष्ठ प्रशासक पुरस्कार, तर चंद्रकांत नामदेव पवार (तांदुळवाडी) आणि बबन तुकाराम पाटील (चोपडी) या दोन मान्यवरांना कृषिरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

डॉ. सुप्रिया प्रशांत सातपुते (जयसिंगपूर), सौ. सुवर्णा दिलीपकुमार इंगवले (सांगोला), पांडुरंग नारायण शिंदे (पंढरपूर), बोधीप्रकाश गायकवाड (सोलापूर) आणि उत्तमराव शिंदे (बलवडी) या मान्यवरांना शिक्षकरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

वर्ल्ड सामनाचे संपादक - प्रकाश कोलते (श्रीरामपूर), कवितासागरचे संपादक - डॉ. सुनील दादा पाटील (कोल्हापूर), आणि अक्षर भेटचे संपादक - सुभाष सुर्यवंशी (मुंबई) यांना सर्वोत्कृष्ठ दिवाळी अंक पुरस्कार देऊन  गौरविण्यात येणार आहे.  

महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचा दशकपूर्ती सोहळा आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभास सांगोला शहर, तालुका व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर, संयुक्त कार्यवाह संजय धोत्रे, सातारा जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे, सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रशांतकुमार मोहिते यांनी केले आहे.