राज्य सरकारच्या विसर्जनाची वेळ आली आहे : विखे-पाटील
अहमदनगर- कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल 100 रुपयांचे अनुदान देऊन राज्य सरकारने कांदा उत्पादकांची चेष्टाच केली आहे. तर विनाअनुदानित शाळांना फक्त 20 टक्के अनुदान देऊन शिक्षकांच्या तोंडालाही पाने पुसली आहेत. शेतकरी, शिक्षक, आणि ग्राहक यांना न्याय न देऊ शकणार्ा राज्य सरकारचे विसर्जन करण्याची वेळ आली असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
राज्यात मराठा समाजाच्या संघटनांनी सुरु केलेल्या आंदोलनाचे गांभीर्यही सरकारने लक्षात घेतले पाहिजे, असेही ते म्हणाले.
अहमदनगर येथील शासकीय विश्रमगृहात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या सरकारला प्रश्नांचा प्राधान्यक्रम समजत नाही हे वेळोवेळी सिध्द झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.