1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 जानेवारी 2019 (09:15 IST)

ख्रिसमस सुट्टी : साई बाबा दर्शन संस्थानाला तब्बल 18 कोटींच्या देणग्या

18 crores donation
यावेळची नाताळ सुट्टी पुन्हा एकदा साई संस्थान ला लाभकारक ठरली आहे. भक्तांनी मंदिराच्या पदरात कोट्यावधींचे दान दिले आहे. सुटी लागून आल्याने शिर्डीमध्ये साईभक्तांची मोठी गर्दी होती. या कालावधीत साई संस्थानाला 18 कोटींच्या देणग्या मिळाल्या असून, डिसेंबरचा शेवटचा आठवडा, 22 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान मिळालेल्या देणग्यांची मोजदाद केली आहे. नपेटीमध्ये साडे आठ कोटी रुपये मिळाले आहे. साई भक्तांनी साडे सोळा किलो चांदी आणि 507 ग्रॅम वजनाचे सोने अर्पण केले असून, ऑनलाईनच्या माध्यमातून 3 कोटी देणगी प्राप्त झालीय. सोबत 3 कोटी 62 लाख रुपये ऑनलाइन, प्यारो मार्फत पाचशेच्या माध्यमातून मिळाले आहेत. दानपेटीमध्ये आलेल्या चलनामध्ये 19 देशांचे 64 लाख किंमतीचेपरकीय चलन मिळाले आहे. गतवर्षी पेक्षा यंदा भाविकांची संख्या कमी होती. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत देणगी 30 लाखांनी कमी आली आहे. हि आलेली रक्कम आता संस्थान लोकपयोगी कामांसाठी वापरणार आहेत.