शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 5 ऑक्टोबर 2022 (13:01 IST)

पालखेड डावा कालव्यासाठी थेट जागतिक बँकेकडून निधी

chagan bhujbal
जागतिक बँकेच्या सिंम्प (SIMP) या कार्यक्रमांतर्गत राज्यातील दोन प्रकल्पांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील पालखेड डावा कालव्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पालखेड डावा कालव्याच्या ० ते ८५ किलो मीटर लाभ क्षेत्रातील कालव्याचे अस्तारीकरण व विस्तारीकरण दुरुस्तीचे काम करण्यासाठी १८५ कोटी रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे. यासाठी लागणारी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लवकरच ही कामे सुरु करण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
 
आज भुजबळ फार्म येथे आयोजित जलसंपदा विभागाकडील विविध प्रलंबित विषयासंदर्भात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने, जलसंपदा विभागाचे उपअभियंता चंद्रकांत टोपले, मिलिंद बागुल, व्ही.डी. बागुल, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर आदी उपस्थित होते.
 
यावेळी बोलतांना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणले की, सिंम्प (SIMP System Improvement Modernisation Programme) या योजनेअंतर्गत एशियन डेव्हलपमेंट बँकेमार्फत निधी पुरविण्यात येणार असून, पालखेड डावा कालवा व त्याच्या लाभ क्षेत्रातील सर्व वितरण व्यवस्था तसेच ग्राउंड वॉटर डेव्हलपमेंट इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. या कामांसाठी 185 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आलेली असून, या प्रस्तावास महाराष्ट्र शासनाच्या फायनान्स डिपार्टमेंटने सहमती दिलेली आहे.
 
सदरची कामे सुरू करण्याआधी एशियन डेव्हलपमेंट बँकेचे कन्सल्टंट क्षेत्रावर येऊन पाहणी करून प्रोजेक्ट रिपोर्ट आल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून काम करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. या कार्याक्रमांतर्गत पालखेड डावा कालव्याची अस्तरीकरण, विस्तारीकरण तसेच एस्केप गेट बसविणे, कालव्यावरील पुल बांधणे, चारी दुरूस्त करणे इत्यादी महत्वपूर्ण कामे करण्यात येणार आहे.
 
याबरोबरच शेतीसाठी लागणारे पाणी, पिण्यासाठी लागणारे पाणी तसेच इतर कारणासाठी लागणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करून पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे. तसेच ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पुल व रस्ता बांधणीसाठी मागणी केली आहे. त्याठीकाणी प्रत्यक्ष क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी भेट देवून गरजेनुसार योग्य तो निर्णय घ्यावा, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या0वेळी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.