Refresh

This website marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/4-lakh-bribe-to-a-person-from-nashik-showing-the-lure-of-profit-in-share-trading-maharashtra-news-regional-marathi-news-121102900043_1.html is currently offline. Cloudflare's Always Online™ shows a snapshot of this web page from the Internet Archive's Wayback Machine. To check for the live version, click Refresh.

रविवार, 5 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (15:45 IST)

शेअर ट्रेडिंगमध्ये नफ्याचे आमिष दाखवत नाशिकच्या व्यक्तीला ४ लाखांना गंडा

4 lakh bribe to a person from Nashik showing the lure of profit in share trading शेअर ट्रेडिंगमध्ये नफ्याचे आमिष दाखवत नाशिकच्या व्यक्तीला ४ लाखांना गंडा News Maharashtra News Regional Marathi News IN Webdunia Marathi
नाशिक : शेअर ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष देत ग्राहकाला चार लाख ६२ हजारांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
 
याप्रकरणी सायबर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि हेमंत सोनवणे (रा. हिरावाडी) यांच्या तक्रारीनुसार, संशयिताने मोबाइलवर ट्रेड २४ रिसर्च या कंपनीतून बोलत असल्याचे सांगत शेअर ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दिले. वेळोवेळी जेना स्मॉल फायनान्स बँकेच्या खात्यात रक्कम भरण्यास सांगत फसवणूक केली. याप्रकरणी निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.