शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 (13:20 IST)

रस्ते अपघातात 5 ठार, 9 जखमी

लग्नासाठी गेलेले कुटुंबीय घरी परत येत असताना झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले तर 9 जण जखमी झाले आहे. हा अपघात मंगळवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडला आहे. हे कुटुंब नागपूर वरून लग्नातून घरी परत येत असताना शेलू बाजार-वाशीम मार्गावर सोयता फाट्याजवळ रस्त्यावर उभा असलेल्या ट्रॅक्टर ला पिकअप व्हॅन धडकून  हा अपघात  झाला. या अपघातात चौघे जागीच ठार ठार झाले तर एकाच उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात 8 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना अकोल्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 
 
या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात वाशीम तालुक्यातील सावंगा जहागीर येथी एकाच कुटुंबातील तिघे मृत्यूमुखी झाले आहे भारत गवळी (40), पूनम गवळी(37) आणि सम्राट गवळी(12) असे या मयताची  नावे  आहे. पिकअप व्हॅन आणि ट्रॅक्टर यांच्यातील धडक एवढी भीषण होती की यात अक्षरश:पिकअप व्हॅन चा चुरडा झाला आहे. अपघाताचे कारण गाडीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे.