रविवार, 29 जानेवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शनिवार, 3 डिसेंबर 2022 (22:15 IST)

35 बनावट कंपन्यांच्या माध्यमातून 500 कोटींची बनावट बिलांचा घोटाळा उघड

scam
राज्य कर जीएसटीच्या औरंगाबाद कार्यालयाने केलेल्या तपासणीत 35 बनावट कंपन्यांच्या माध्यमातून 500 कोटींची बनावट बिलांचा घोटाळा समोर आला आहे. या घोटाळ्याची व्याप्ती तब्बल 1000 कोटींच्या घरात असल्याचा अंदाज जीएसटी कार्यालयाने व्यक्त केला आहे. सध्या राज्यकर जीएसटी विभाग या बनावट बिलांचा तपास करीत आहे. दरम्यान, जीएसटी विभागाने बनावट बिले लावून जीएसटीची फसवणुक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले होते. फैजल अब्दुल गफ्फार आणि मोहम्मद अजीज मोहम्मद फकीर अशी या दोन आरोपींची नावे आहेत. त्यांच्या चौकशीनंतर बनावट बिलांचा घोटाळा समोर आला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जीएसटी विभागाच्या कोठडीत असलेले आरोपी फैजल अब्दूल गफार मेवावला आणि मोहोमद अजिज यांनी 35 बनावट कंपन्यांच्या माध्यमातून सध्या जवळपास 500 कोटींची बनावट बिले केली होती. आता या घोटाळ्याची व्याप्ती तब्बल 1 हजार कोटींच्या घरात असल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे.
 
दरम्यान, बोगस कंपन्या स्थापन करत इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेत 1 हजार कोटींपेक्षा अधिकचा घोटाळा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश औरंगाबादच्या स्टेट जीएसटी केला होता. या प्रकरणाची व्याप्ती आता हजार कोटीच्या पुढे आणि गुजरातसह देशातल्या विविध राज्यांत असल्याने तपास सुरू केला आहे. तसेच, याप्रकरणी मुंबईत डोंगरी येथून औरंगाबाद स्टेट जीएसटी विभागाने दोघांना ताब्यात घेतले आहे.