मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 14 डिसेंबर 2020 (08:38 IST)

बाप्परे, एसटी महामंडळाच्या ९७ कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत मृत्यू

एसटी महामंडळाच्या ९७ कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. महिनाभरात १३ जण दगावले आहेत. ठाणे, पुणे, जळगाव या विभागात सर्वाधिक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
 
एसटी महामंडळाचे राज्यात एकूण ३ हजार ६३४ अधिकारी, कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. यामध्ये ३ हजार १३० कर्मचारी उपचार घेऊन परत आले. तर ४०७ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. मृत झालेले सर्वाधिक कर्मचारी हे ठाणे विभागातील वेगवेगळ्या आगारांतील असून त्यांची संख्या ११ आहे. त्यापाठोपाठ पुणे आणि सांगली विभागातील प्रत्येकी आठ, जळगाव विभागातील ७, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर विभागातील प्रत्येकी ६ कर्मचारी आहेत.  
 
कर्तव्यावर असलेल्या चालक, वाहक, वाहतूक नियंत्रक, सुरक्षा रक्षक यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना ५० लाखांची आर्थिक मदत देण्यात येते. परंतु कर्तव्यावर असलेल्या अन्य कर्मचाऱ्यांना संरक्षण काय? मृत झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वारसांनाच ही मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली. आतापर्यंत सहा जणांनाच मदत मिळाली आहे.