मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 जानेवारी 2021 (21:29 IST)

ग्राम पंचायत निवडणुकीत आप ने खाते उघडले

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने महाराष्ट्राच्या ग्राम पंचायत निवडणुकीत खातं उघडलं आहे. लातूर जिल्ह्यातील दापक्याळ ग्रामपंचायतीत 'आप'चे सात पैकी पाच उमेदवार निवडून आले आहेत. 
 
आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र युवा अध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी 'आप'च्या उमेदवारांच्या विजयाची माहिती ट्विट केली आहे. अजिंक्य शिंदे यांनी विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे. विशेष म्हणजे, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनीही याची दखल घेत विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे. केजरीवाल यांनी खास यासाठी मराठीतून ट्विट केलं आहे. 
 
"विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! जनतेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ करा, जनतेची सेवा करा. पुढील कार्यास शुभेच्छा", असं ट्विट केजरीवाल यांनी केलं आहे.