सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 30 एप्रिल 2022 (08:08 IST)

अनिल देशमुखांच्या मुलाला घेऊन अजित पवार नितीन गडकरींच्या भेटीला

ajit pawar
महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप हा सामना ऐन रंगात असतानाच, उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना भेटले. यात विशेष म्हणजे, या भेटीदरम्यान महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुखही उपस्थित होते.
 
या भेटीदरम्यान महाराष्ट्राचे विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलही उपस्थित होते.
 
या बैठकीबाबत अजित पवार म्हणाले की, राज्यातील रस्त्यांसाठी केंद्र सरकारकडून निधी मिळावा म्हणून नितीन गडकरींकडे मागणी केली.
 
विकास कामात कुठे राजकारण येऊ नये म्हणून आम्ही त्यांच्या घरी जाऊन चर्चा केली, असंही अजित पवार सांगितलं.
 
अजित पवारांनी रस्ते आणि इतर विकासकामांचं कारण या भेटीमागे असल्याचं सांगितलं असलं, तरी राजकीय वर्तुळात या चर्चेला उधाण आलं आहे. त्यात सलील देशमुख हे या भेटीदरम्यान सोबत असल्यानं या चर्चेला अधिकच बळ मिळालं आहे.