शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: उस्मानाबाद , मंगळवार, 14 जून 2022 (15:20 IST)

समितीच्या बैठकीत अंडा भुर्जी

samiti meeting
उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थित जिल्हास्तरीय दिशा समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या बैठकीत अजब प्रकार पहायला मिळाल्याचे समोर आले आहे. खासदार आणि आमदार यांच्याकडून विविध विकास कामांचा आढावा घेण्यात येत होता. मात्र यावेळी अधिकारी चक्क मोबाईलवर व्यस्त होते.कोणी रेसिपी पाहत होते. तर, कोणी फेसबुक पाहण्यात व्यस्त होतं. तर, याहून कहर म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधीक्षक अभियंता सुनीता पाटील तर कँडी क्रश गेम खेळण्यात व्यस्त असल्याचं पहायला मिळाले. दिशा समितीची बैठकीत अजब प्रकार, काही अधिकारी खेळत होते गेम, तर काहीजण बघत होते अंडा भुर्जीची रेसिपी.