मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 (15:40 IST)

अंधेरी : अखेर भाजपकडून उमेदवारी अर्ज मागे,पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार नसणार

kamal 600
निवडणुकीतून अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्यादिवशी भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी अर्ज माघारी घेतला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरेंनी केलेली विनंती, शरद पवारांचे आवाहन आणि प्रताप सरनाईक यांचे पत्र, यानंतर भाजप नेत्यांमध्ये तातडीच्या बैठका झाल्या आणि अखेर शिवसेना उमेदवार ऋुतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. त्यामुळे, आता अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार नसणार आहे.
 
भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी.टी. रवि आणि मुंबईचे भाजप अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांच्यात बैठकझाली. या बैठकीनंतर भाजपने उमेदवारी मागे घेतल्याचा निर्मय जाहीर केला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा अर्ज परत घेत आहे. लटके या निवडून याव्या यासाठी अर्ज परत घेत आहोत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले. दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'मेघदूत' बंगल्यावर रविवारी रात्री उशिरा बैठक झाली. या बैठकील मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार मुरजी पटेल (Muraji Patel) उपस्थित होते. मुरजी पटेल हे निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम होते. आपली पूर्ण तयारी झाल्याचं पटेल यांनी सांगितलं. तर आशिष शेलार यांचाही पोटनिवडणूक लढवण्याचा आग्रह होता. मात्र, अखेर सी. टी. राव यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर भाजपने उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे, आता, ऋुतुजा लटके यांचा विजय सोपा झाला आहे.
 
Edited By - Ratandeep Ranshoor