रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 फेब्रुवारी 2022 (16:06 IST)

तृतीय पंथिया बाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय- आरोग्य मंत्री राजेश टोपे

तृतीय पंथीयांना समाजात समान हक्क मिळावा यासाठी वेगवेगळ्या पातळीवर काम सुरु आहे. यांच्याकडे समाजात वेगळ्या दृष्टीने पहिले जाते. राज्य सरकार तृतीयपंथीयांसाठी आणि त्यांच्या चांगल्या आरोग्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे. त्या संदर्भात तृतीयपंथीयांच्या समस्या विषयक चर्चा करण्यासाठी मंत्रालयात महत्वाची बैठक घेण्यात आली. या संदर्भात ट्विट करून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. तृतीयपंथी हे आपल्या समाजाचाच एक भाग असून त्यांना देखील सन्मान मिळावा आणि त्यांना देखील सन्मानाचे जीवन जगता यावे असे म्हटले आहे 
 
ट्रान्सजेंडर लोकांचा समस्या त्यांच्या आरोग्यविषयक समस्या आणि त्यांना लिंग परिवर्तन करण्यासाठी लागणारी शस्त्रक्रिया, लेसर आणि त्यावरील संप्रेरक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी त्यासाठीचा आराखडा तयार करावा. अशा सूचना दिल्या गेल्या. 
 
 त्यांना देखील समाजात मान मिळावे.त्यांना देखील या समाजात सन्मानाने जगता यावे. त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी मंत्रालयात बैठक झाली.