सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 19 ऑक्टोबर 2023 (21:00 IST)

मंत्रीमंडळ बैठकीत : शिंदे-फडणवीस-पवार सरकारने घेतले 'हे' धडाकेबाज निर्णय

shinde panwar fadnavis
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची  महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत विविध भागांसाठी महत्त्वाचे मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
 
शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या या बैठकीत सरकारच्या वतीनं आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान या बैठकीत राज्यातील अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
 
राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय
 
महाराष्ट्र राज्य  सहकारी बँक, मुंबई मधून शासकीय बँकिंग व्यवहार करता येणार  ( वित्त विभाग)
महाप्रितमार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबविणार. परवडणारी घरे मोठ्या प्रमाणावर उभारणार ( सामाजिक न्याय )
राज्यातील सूतगिरण्या सुरळीतपणे चालवणार. पुढील पाच वर्षे कर्जावरील व्याज शासन भरणार ( सहकार व वस्त्रोद्योग)
कोराडीत सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्पास मान्यता ( ऊर्जा विभाग)
इमारत व बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ गतीने मिळणार. कामगार नियमांत सुधारणा करणार( कामगार विभाग)
बार्टी, सारथी, महज्योती, अमृत या संस्थांच्या कार्यक्रमांत समानता आणण्यासाठी धोरण ( सामाजिक न्याय)
अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय.
महाप्रितमार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबविणार. परवडणारी घरे मोठ्या प्रमाणावर उभारणार.
राज्यात चार धर्मादाय सह आयुक्त पदांची निर्मिती करणार.