1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021 (15:59 IST)

राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता

पुढच्या काही दिवसांमध्ये राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह देशात 16 ते 20 फेब्रुवारीदरम्यान पाऊस पडेल असा इशारा स्कायमेटनं दिला आहे. या अवकाळी पावसाचा फटका, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओदिशा, झारखंड, छत्तीसगड, कर्नाटकचा अंतर्गत भाग, तेलंगाणा आणि तामिळनाडूला बसणार आहे.
 
पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड तसेच विदर्भाच्यावर एक चक्रिवादळी हवेचे क्षेत्र विकसित होऊ शकते. त्यामुळे तेलंगाणमधून दक्षिण तामिळनाडूपर्यंत एक ट्रफ विकसित होऊ शकते. या दोन्ही हवामानाच्या परिस्थितीमुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामधून बाष्प भूभागावर येईल त्यामुळे हवामान बिघडून पाऊस पडू शकतो असं हवामान तज्ज्ञांनी म्हटलं आहे.