गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 7 जानेवारी 2023 (21:02 IST)

‘थोबाड फोडून टाकेल’, चित्रा वाघ यांचा उर्फी जावेदला इशारा

चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात सध्या सुरू असलेला वाद कोणत्या ना कोणत्या कारणामुळे पुन्हा भडकत आहे. चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांचे उत्तर प्रत्युत्तर सुरू असल्याने वाद आणखीन रंगला आहे दरम्यान आता उर्फीला थोबाड फोडून टाकेल अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी इशारा दिला आहे.
 
भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यात सुरु असलेला वाद शामण्याचे नाव घेत नाहीये. सध्या त्यांच्यात शाब्दिक युध्द सुरु आहे. हटके कपड्यावरून उर्फी कायमच चर्चेत असते तर कधी टीकेची शिकारही बनते. टीका करणाऱ्यांना ती तिच्या शैलीत उत्तर देखील देते. दरम्यान आता तर तिने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याशी पंगा घेतला आहे. “आजही सांगते थोबाड फोडून टाकेन”, अशा शब्दांत भाजप चित्रा वाघ यांनी उर्फीला इशारा दिला आहे.
 
चित्रा वाघ पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी पत्रकारांनी साडीचोळी देवून आंदोलन करणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर “त्यासाठी समोरचीपण लायकीची लागते, साडीचोळी हे सात्विकतेचं प्रतीक आहे”, असं टीकास्त्र चित्रा वाघ यांनी सोडलं.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor