महा विकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा वाद
काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांवर अशासकीय नियुक्त्या केल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. इतकेच काय तर काँग्रेस नेत्यांनाही या नियुक्त्या करताना विश्वासात घेतले नसल्याचे सांगितले जात आहे.
उर्जा खात्याशी संबंधित असलेल्या पारेषण, निर्मिती यासारख्या कंपन्यांच्या संचालक मंडळावर अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या नियुक्त्या करत असताना नितीन राऊत यांनी आघाडीतील इतर पक्षांशी चर्चा केली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच या खात्याचे राज्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असून त्यांनाही याबाबत कल्पना मिळाली नसल्याचे समोर येत आहे.
महा विकास आघाडीने अद्याप महमंडळाच्या नियुक्त्या केलेल्या नाहीत. महामंडळ आणि इतर नियुक्त्या करत असताना तीनही पक्षांशी चर्चा होणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा न झाल्यामुळे आता या नेमणुका रद्द करण्यात याव्यात अशी मागणी केली जात आहे.