गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 6 फेब्रुवारी 2022 (18:17 IST)

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचं संकट

राज्यात वातावरणाच्या बदल मुळे किनारी पट्टीच्या भागात हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. राज्यावर अवकाळी पावसाचे संकट असून पुढील दोन दिवस किनारी भागात पावसाची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची लाट कायम असण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. वातावरणाच्या बदल मुळे किनारी भागात येत्या दोन दिवसात मेघसरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणातील किनारपट्टीतील शेतकरी चिंतेत आहे.