शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 30 जुलै 2022 (10:08 IST)

Dahi Handi :राज्यात दहीहांडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर

dahi handi
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना मुख्य सचिवांना देण्यात येणार असून राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

दही हंडी हा सण महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण आहे. काही ठिकाणी सार्वजनिक सुट्ट्या जिल्हाधिकारी जाहीर करतात. गेल्या दोन वर्षे सर्व सण कोरोनाच्या सावटाखाली गेले. सर्व सण कोरोनाच्या निर्बंधाखाली साजरे केले गेले. यंदाच्या वर्षी कोरोनाची लाट ओसरल्यामुळे आणि कोरोनाचे सर्व निर्बंध काढण्यात आल्यामुळे यंदाच्या वर्षी सर्वच सण दणक्यात आणि मोकळ्यापणाने उत्साहात साजरे केले जाणार आहे. यंदा कोणत्याही सणाला कुठले ही निर्बंध नसल्याने सर्व सण उत्साहात आणि दणक्यात जल्लोषात आनंदानं साजरा करावे तसेच दही हंडीच्या उत्सवासाठी  थरांच्या बाबत सर्व गोविदांनी न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करून रचाव्यात असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. 

शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दहीहांडीला राष्ट्रीय सण म्हणून मान्यता मिळावी आणि त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली होती. आणि तसे निवेदन देखील पाठविले होते. आमदारांच्या मागणीला तातडीनं प्रतिसाद देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना मुख्य सचिवांना देण्यात आल्या.