शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 9 जुलै 2023 (15:41 IST)

Dapoli : एकाच कुटुंबातील चौघं गायब, दापोलीतील घटना

रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील विसापूर गावात एकाच कुटुंबातील चार जण बेपत्ता झाल्याची मोठी घटना घडली आहे.या कुटुंबातील बेपत्ता सदस्यांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 
 
2 जुलै रोजी विसापूर गावातील पाथरी कोंड येथे राहत्या घरातून भरत भेलेकर दुपारच्या सुमारास बेपत्ता झाले. भरत भेलेकर 2 जुलै रोजी दुपारी आपल्या चुलत भाऊ सहदेव दत्ताराम भेलेकर याच्या सह मंडणगड मधील कुंबळे या ठिकाणी गेला होता. लाकडी पट्टी आणायला जात असल्याचे सांगून तो घरातून निघाला आणि परत आलाच नाही.   नंतर 3 जुलै रोजी त्यांची पत्नी सुगंधा या सकाळी मुलांना शाळेत सोडायला जाण्याचे सांगून गेल्या आणि परतल्या नाही. त्यांच्या सोबत त्यांचे मुलं आराध्य आणि श्री हे देखील बेपत्ता झाले आहे.नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला मात्र त्यांना शोध लागला नाही. अखेर कुटुंब बेपत्ता होण्याची तक्रार पोलिसात देण्यात आली.   
 
मिळालेल्या माहितीनुसार, भरत यांना घरातून पळून जाण्याची सवय आहे. ते काही दिवसांपूर्वी देखील बेपत्ता झाले होते. मात्र आता त्यांची पत्नी आणि दोघे मुले देखील बेपत्ता झाल्याने नातेवाईक काळजीत असून त्यांचा शोध सुरु आहे. अक्ख कुटुंब बेपत्ता झाल्यामुळे पोलिसांना याची माहिती देण्यात आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 
 
 
 
Edited by - Priya Dixit