रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 मे 2019 (10:05 IST)

शेतकऱ्यांच्या अनुदानातून कृषी कर्जाचे हप्ते वळते करू नका

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमेतून त्यांच्या कृषी कर्जाचे हप्ते वळते करू नयेत. त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी बँकांना सक्त सूचना द्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक जिल्ह्याच्या दुष्काळ आढावा बैठकीत दिले. वर्षा निवासस्थानाहून त्यांनी आॅडियो ब्रीजद्वारे नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील सरपंच व अधिकाऱ्याशी संवाद साधला.
 
नाशिक जिल्ह्यातील सुमारे ३५ सरपंचांशी मोबाईलवरुन थेट संवाद साधून त्यांच्याशी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली. तसेच पाणी टंचाईच्या अडचणी समजून घेतल्या. मुख्य सचिव युपीएस मदान आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
दुष्काळी जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजने अंतर्गत जास्तीत कामे सुरु करा, तीन दिवसात या कामांना मंजुरी द्या, असे निर्देश त्यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या दुष्काळ आढावा बैठकीत दिले. आचारसंहितेचे कारण देऊन दुष्काळावरील उपाययोजनांची कामे प्रलंबित ठेऊ नयेत, असेही बजावले.