रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 31 जानेवारी 2023 (12:37 IST)

विस्तारा फ्लाइटमध्ये मद्यधुंद प्रवासी महिलेचा गोंधळ, केबिन क्रू सोबत हाणामारी

उड्डाणांमधील गोंधळ थांबताना दिसत नाही. आता विस्तारा फ्लाइटमध्ये गोंधळाचे प्रकरण समोर आले आहे. अबुधाबीहून मुंबईला येणाऱ्या फ्लाइटमध्ये एका मद्यधुंद इटालियन महिलेने केबिन क्रूला मारहाण केली. एवढेच नाही तर फ्लाइटमध्ये त्याने आपले कपडेही काढले. मुंबई पोलिसांनी महिले विरोधात गुन्हा दाखल केला असून तिला नोटीस बजावली आहे.
 
पोलिसांनी सांगितले की, इटालियन वंशाच्या महिलेचे नाव पाओला पेरुशियो आहे. केबिन क्रूशी इकॉनॉमी तिकीट असूनही ती बिझनेस क्लासमध्ये बसण्याचा आग्रह धरत होती .जेव्हा क्रूने नकार दिला तेव्हा ती हिंसक झाली आणि केबिन क्रूशी भांडू लागली. एवढेच नाही तर तिने तिचे काही कपडेही काढले आणि विमानात मधोमध फिरू लागली. 
 
विस्तारानेही या घटनेबाबत निवेदन जारी केले आहे. कंपनीने सांगितले की, ही घटना 30 जानेवारी रोजी फ्लाइट क्रमांक UK 256 वर घडली. या विमानाने अबुधाबीहून मुंबईला उड्डाण केले. यामध्ये एका प्रवाशाने मद्यधुंद अवस्थेत केबिन क्रू आणि इतर प्रवाशांना हिंसक वर्तन करत इजा करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान फ्लाइटच्या कॅप्टनने महिलेला वॉर्निंग कार्ड जारी केले. 
 
Edited By- Priya Dixit