मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 सप्टेंबर 2024 (17:40 IST)

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणामुळे देश विकसित होणार-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

droupadi murmu
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लातूर जिल्ह्यात उदगीर येथे विश्वशांती बुद्धविहाराचे उदघाटन केले. या वेळी त्यांनी महिलांच्या हक्काबाबत चर्चा केली. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणामुळे देशाचा विकास होईल असे त्या म्हणाल्या. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राबविल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि शासन आपल्या दारी या कार्यक्रमांच्या लाभार्थींना संबोधित करताना म्हणाल्या,

आर्थिक सक्षमीकरणामुळे महिलांचा वैयक्तिक विकास होईल ज्या देशाच्या लोकसंख्येच्या अर्ध्या आहेत. त्या म्हणाल्या,  राज्य सरकारने 25 लाख महिलांना लखपती दिली बनवण्याचे उध्दिष्टये ठेवले आहे. 13 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्यात आल्याचे जाणून मला आनंद झाला आहे. 

पुरुषांनी महिलांची क्षमता समजून घेऊन त्यांची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यात मदत केली पाहिजे. देशाच्या कार्यशक्तीमध्ये महिलांचा सहभाग वाढत आहे.

त्या लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे विश्वशांती बुध्दविहारचे उदघाटन करण्यासाठी आल्या होत्या. उद्घाटन सोहळ्याला राज्यपाल सीपी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्यमंत्री संजय बनसोडे आणि अदिती तटकरे आणि अखिल भारतीय भिक्षू संघाचे सदस्य उपस्थित होते. 
Edited by - Priya Dixit