शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 13 जानेवारी 2022 (16:24 IST)

शिक्षणात खंडं पडतोय; शाळा बंदच्या निर्णयाला विरोध

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील सर्व शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आता सर्वच स्तरातून या निर्णयाचा विरोध होत आहे. विद्यार्थी पालकांसह आता शिक्षकांचा आणि तज्ज्ञांचा विरोध ही दिसून येत आहे. 
 
आता सरसकट शाळा बंद विरोधात समाज माध्यमावर मोहीम सुरू केली गेली असून ‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी’ हे स्लोगन देणाऱ्या शिक्षण मंत्र्यांनी विचार न करता हा निर्णय घेतल्याचा आरोप होत आहे.
 
दहावी आणि बारावीच्या सराव परीक्षा सुरू असताना शासनाने घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांचे नुकसान करणारा असल्याचा आरोप केला जात आहे. शाळा बंद करण्यापेक्षा नियोजन करून शाळा सुरू ठेवाव्या अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. 
 
ग्रामीण भागांमध्ये करोनाचा शिरकाव नसतानाही शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होताना दिसत आहे कारण ग्रामीण भागात इंटरनेटची अडचण असते. तसेच अनेक विषय ऑनलाईन पद्धतीने समजून घेणे अवघड जातं. या सर्व कारणांमुळे शाळा ऑफलाईन पद्धतीने सुरू ठेवण्याची मागणी शिक्षण तज्ज्ञ करत आहेत.