गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 24 जानेवारी 2018 (08:57 IST)

वीज कनेक्शन नाही मात्र बिल २७ हजार

electricity bill
महावितरणचा कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. यावेळी त्यांनी चक्क ज्याच्याकडे कनेक्शन नाही त्याला बिल पाठवले आहे.महावितरणने शेतकऱ्याला तब्बल 26 हजार रुपयांचं वीज बिल पाठवलं आहे. ही घटना  यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील कोपरा गावातील घडली आहे. यात  अंबादास खापरकर यांना महावितरणच्या या अजब कारभारामुळे बिल मिळाले आहे. यामध्ये अंबादास खापरकर यांच्याकडे 2 एकर कोरडवाहू शेती असून, कोरडवाहू शेतीत उत्पन्न होत नाही म्हणून त्यांनी मजुरीतून मिळालेल्या पैशातून त्यांनी शेतात बोअरवेल खोदल आहे. आता वीज वितरण विभागाकडे 2013 ला वीज कनेक्शनसाठी अर्ज केला होता. मात्र त्यांना अर्ज केला आणि डिमांड भरला होता तरीही त्यांना  वीज कनेक्शन पाच वर्षात मिळाले नाहीच उलट त्यांना  वीज जोडणीसाठी 5 खांब लागतील म्हणून वीज वितरण कंपनीने वीज जोडणी नाकारली आणि  धक्कादायक प्रकार म्हणजे  खापरकर यांना पाच वर्षांनंतर 26 हजार रुपये बिल पाठवलं आहे. त्यामुळे आता कारभार कसा सुरु आहे हे दिसून येतेय.