सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , बुधवार, 16 ऑगस्ट 2023 (20:08 IST)

नाशिक जिल्ह्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणेने खळबळ

pakistan jindabad
social media
Pakistan Zindabad:पुण्यातील कोंढवा परिसरात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. हे प्रकरण ताजं असतानाच नाशिकमध्ये ही अशीच संतापजनक घटना घडली आहे. नाशिकमध्येही पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्या आल्या . नाशिकच्या चांदवड टोलनाक्यावरील कर्मचाऱ्याने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या.  टोल नाका व्यवस्थापक मनोज पवार यांनी याबाबत  माहिती दिली. चांदवडच्या मंगरूळ येथील टोलनाक्यावरील कर्मचारी शेहबाज कुरेशी याने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. 
 
देशभरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. अशातच नाशिकच्या चांदवड येथील मंगरूळ टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी पाकिस्तान जिंदाबादचे घोषणा दिल्याची घटना घडली. त्यामुळे टोलनाक्यावर काम करत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांना आश्चर्य व्यक्त केले. तातडीने स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. तसेच टोल प्रशासनाने तात्काळ संबंधित कर्मचाऱ्यास निलंबित केले आहे. मात्र या घटनेने चांदवड शहरसह परिसरात चांगलीच खळबळ उडाली.