1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

नवर्‍याने झोपेतच बायको आणि सासूची हत्या केली

crime
अहमदनगर- नगर जिल्ह्यातील राहुरी येथे एका धक्कादायक घटनेत नवर्‍याने बायको आणि सासूची हत्या केल्याचे समोर आले आहे.
 
कौटुंबिक वादातून नवर्‍याने रात्री झोपेत असतानाच बायको आणि सासूच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार करुन दोघांचा खून केला. दोघांचा खून केल्यानंतर आरोपी नवर्‍याने घरातून पळ काढला आहे. 
 
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. पोलीस फरार आरोपी सागर सुरेश साबळेचा शोध घेत आहे.
 
पत्नी नूतन सागर साबळे (वय 23) तर सासू सुरेखा दिलीप दांगट (वय 45) असे मृतकांची नावे आहेत. आरोपीच्या भावाने दोन्ही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे बघितल्यावर घटनेची माहिती पोलिसांना दिली होती.