गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 13 ऑगस्ट 2023 (11:58 IST)

बेळगाव : विजेच्या धक्क्याने आजी,आजोबांसह नातीचा मृत्यू

electric shock
बेळगावच्या शाहू नगरच्या अन्नपूर्णावाडी येथे धक्कादायक घटना घडली आहे. येथे विजेच्या धक्क्याने आजी, आजोबांसह चिमुकल्या नातीचा मृत्यू झाला आहे. इराप्पा गंगाप्पा राठोड(50), शांता इराप्पा राठोड(48) आणि अन्नपूर्णा होनप्पा लमाणी (8)असे या मयतांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी घर मालक सरोजिनी फकीराप्पा  नरसिंगण्णावर गुन्हा दाखल केला आहे. 
 
सरोजिनी तिसरा क्रॉस शाहुनगरात आपल्या नवीन घराचे बांधकाम करत आहे. त्यांनी या ठिकाणी वॉचमन म्हणून मयत राठोड कुटुंबियांना कामावर ठेवले होते. त्यांना राहण्यासाठी दिलेल्या खोलीत  लाईनमेनने वीजवायर जोडणी केली असून हेस्कॉमचे अधिकारी आणि वायरमनला ही बाब माहित होती. लाईनमेन ने असुरक्षितरित्या वीजजोडणी केली. नवीन घराच्या स्लॅब साठी लोखण्डी पाईप लावले आहे. सकाळी चिमुकल्या अन्नपूर्णाचे आईवडील कामाला गेले असता घरात अन्नपूर्णा आजी-आजोबांच्या घरातच खेळात होती. 

सकाळी 6 ते 6 :30 च्या दरम्यान शेडला शॉर्ट वायरचा स्पर्श झाल्यामुळे घरात विजेचा प्रवाह झाला आणि विजेचा धक्का लागून आजी-आजोबा आणि नातीचा दुर्देवी मृत्यू झाला. सदर घटना उघडकीस आल्यावर हेस्कॉम आणि पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचे पंचनामे केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले मृतदेह शवविच्छेदना नंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे. 
 
Edited by - Priya Dixit