शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (18:14 IST)

फडणवीसांचा ठाकरे सरकारवर टीकास्त्र

Fadnavis criticizes Thackeray governmentफडणवीसांचा ठाकरे सरकारवर टीकास्त्रMarathi Regional News In Webdunia Marathi
औरंगाबाद येथे गंगापूर तालुक्यात लासूर येथे आज भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस विविध योजनांच्या लाभार्थीच्या कार्यक्रमात बोलत असताना शिवसेना आणि ठाकरे सरकारवर टीकास्त्र केले. 
ते म्हणाले की, आता ठाकरे सरकारला मराठवाड्याची काहीच चिंता नाही. ज्या मराठवाड्याने शिवसेनेनेला नाव दिले. त्याच मराठवाड्याचा विसर शिवसेनेला पडला आहे. आमची सरकार असताना प्रत्येकवेळी आम्ही गरजूंची मदत केली. पण हे सरकार कोणाचीच मदत करत नाही. मराठवाडा हे फक्त काहींच्या तोंडी असतो पण मनात नाही.असं असत तर मराठवाड्याचे वैधानिक विकास झाले असते. इथले शेतकरी बांधव कसे राहत आहे, त्यांचे काय सुरु आहे? हे सरकार मोठ्या लोकांच्या विजेची थकबाकी असून त्यांचे वीज कनेक्शन कापत नाही पण शेतकऱ्यांची थकबाकी असल्यास त्यांचे वीजकनेक्शन लगेच कापून देतात. गंगापूर तालुक्यात लासूर स्टेशन येथे विविध योजनांच्या लाभार्थीच्या वाटप कार्यक्रमात बोलताना त्यांनी शिवसेना आणि ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र केली.