मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (16:41 IST)

तीन मुलांचा शेततळ्यात पडून मृत्यू

औरंगाबाद येथील शेकापूर शिवारातील एका शेततळ्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. हे तिघे मुलं सायकल वर भांगसीमाता गडाकडे फिरण्यासाठी गेले असता या शेततळ्यात कसे गेले अद्याप हे समजू शकले नाही. हे शेततळे हरिश्चंद्र वाघमारे यांचे आहे. प्रतीक आनंद भिसे(15), तिरुपती मारुती दळकर(15), आणि शिवराज संजय पवार(17) असे या मयत मुलांची नावे आहेत. हे तिघे सारा संगम, बजाज नगर येथील रहिवासी होते. 
 
सोमवारी सकाळी हे तिघे सायकलवरून फिरायला निघाले होते. ते शेततळ्यात कसे बुडाले याची माहिती मिळाली नाही. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनास पाठविले आहेत. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.