सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 मे 2024 (09:49 IST)

आंबेगाव येथे शेततळ्यात बुडून चार विद्यार्थ्यांचा मृत्यू

water death
आंबेगाव तालुक्यात निरगुडसर येथे शेततळ्यात बुडून चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 
शेतमजूर कुटुंबातील ही चारही मुले  शाळेला सुट्टी असल्यामुळे शेततळ्यात खेळत होती. खेळत खेळत ते सर्वजण शेततळ्यात उतरले पाण्याचा अंदाज न आल्यामुळे आणि तसेच पोहता येत नसल्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.सायली काळू नवले(11), दीपक दत्ता(7), श्रद्धा काळू नवले(13),राधिका नितीन केदारी (14) अशी मयत विद्यार्थ्यांची नावे आहे. 

श्रद्धा आणि सायली या मुलींना गोरक्षनाथ बबन कवठे यांनी दत्तक घेतले असून ते शेतमजुरीचे काम करतात. मुले शेततळ्यात उतरल्यावर त्यांना पाण्याचा अंदाज लागला नाही आणि ते पाण्यात बुडाले. मुले पाण्यात बुडाल्याची माहिती मिळाल्यावर बबन कवठे आणि त्यांची पत्नी शेततळ्यात पोहोचले तो पर्यंत मुलांचा बुडून मृत्यू झाला. मयत मुलांना शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. या दुर्देवी घटनेमुळे शेतमजूर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. 
 
Edited by - Priya Dixit