शुक्रवार, 1 डिसेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 सप्टेंबर 2023 (07:45 IST)

फेसबुकवरील मैत्री पडली महागात! गोंदियातील शिक्षिकेला तब्बल १२ लाख ३५ हजारांचा गंडा

facebook
गोंदियातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गिफ्ट पाठवतो असं म्हणत शिक्षिकेला तब्बल १२ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. गोंदिया जिल्ह्यातून एक प्रकार उघडकीस आला आहे. फसवणूक झालेली शिक्षिका ही गोरेगाव तालुक्याच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिचगावटोला इथे कार्यरत आहे. या महिलेची अमेरिकेतील व्यक्तीशी फेसबुकवरुन मैत्री झाली होती. आपण अमेरिकेत वास्तव्यास असल्याचं त्याने शिक्षिकेला सांगितलं. त्याने शिक्षिकेला महागडे गिफ्ट पाठवण्याचे सोंग केलं.
 
त्याच्या या नाटकात इतर तिघांचा समावेश होता. ते गिफ्ट दिल्लीला आले, आता घरापर्यंत येण्यासाठी त्याचे चार्ज पे करावे लागतील, असं सांगत शिक्षिकेला तब्बल १२ लाख ३५ हजार ६०० रुपये लुटल्याचा प्रकार घडला आहे. या शिक्षिकेचं फेसबुकवर अकाऊंट असून जून २०२३ मध्ये तिची जॅक्सन जेम्स या तरुणासोबत मैत्री झाली होती. मैत्री झाल्यानंतर जॅक्सन जेम्स या तरुणाने माझा वाढदिवस आहे.
 
‘मी तुम्हाला गिफ्ट पाठवतो, तुमचा पत्ता सांगा,’ असं म्हणत शिक्षेकडून पत्ता मागवला आणि त्या पत्त्यावर गिफ्ट पाठवल्याचं नाटक केल. घरापर्यंत येण्यासाठी त्याचे चार्ज पे करावे लागतील, असं सांगत शिक्षिकेला तब्बल १२ लाख ३५ हजार ६०० रुपये लुटल्याचा प्रकार घडला आहे. आपली फसवणूक झाल्याची लक्षात येतात या शिक्षिकेने गोरेगाव पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपस करत आहे.