बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जुलै 2022 (13:07 IST)

गिरीश महाजन यांनी घेतली अमित शहांची भेट

girish mahajan
राज्यात सत्तांतर होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला देखील बरोबर एक महिना झाला आहे, परंतु अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यामुळे दररोज त्या संदर्भात चर्चा सुरू आहे. तसेच वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच आता राज्याचे माजी मंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने या चर्चेला अधिकच उधाण आले आहे.
 
मंत्रिमंडळ विस्तार का रखडला याची माहिती आता समोर येत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची म्हटले जात आहे. अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात याबाबत अजूनही चर्चा झाली नसल्याने विस्तार रखडल्याचे सांगण्यात येते, विस्ताराबाबत अंतिम निर्णय अमित शाह घेणार असून त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच विस्ताराचा मुहूर्त ठरणार मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब झाला यात शंका नाही. मात्र याबाबत कोणत्याही स्तरावर वाद नाही. येत्या तीन दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार करू. मंत्रिपदाच्या निवडीबाबत कोणताही वाद नाही, आता यात विलंब होणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
 
गिरीश महाजन आणि अमित शहा यांच्यात राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात गिरीश महाजन यांना मोठे खाते मिळण्याची शक्यता आहे. गिरीश महाजन भाजपमधील आघाडीवरील नेते आहेत. उत्तर महाराष्ट्रातल्या राजकारणात त्यांचा मोठा दबदबा आहे. गिरीश महाजन हे राज्याचे जलसंपदा मंत्री होते.ते जामनेरचे आमदार आहेत. उत्तर महाराष्ट्रतील‌ राजकारणात त्यांचा प्रभाव आहे. महाजन सलग‌‌ सहा वेळा जामनेरमधून विधानसभेवर निवडून आलेले आहेत. महाजन यांची देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातली कामगिरी ही लक्षणीय राहिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात प्रत्येक आंदोलनाला सामोरे जायला महाजन हजर असायचे. अनेक मोर्चे महाजन यांनी शांत केली आहेत. त्यामुळे महत्वाच्या खात्यावर त्यांची वर्णी लागणार आहे.