राज्याचा बारावीचा निकाल 94.22 टक्के; यंदाही मुलींनी बाजी मारली
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board)घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडं राज्याचं लक्ष होतं. अखेर बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल 94.22टक्के इतका लागला असून निकालात मुलींनी बाजी मारली आहे. फेब्रुवारी - मार्च 2020च्या तुलनेत हा निकाल एकूण 3.56 टक्क्यांनी वाढला आहे.(Maharashtra HSC Board Result News)
कोणत्या विभागाचा किती टक्के निकाल?
पुणे: ९३.६१%
नागपुर: ९६.५२%
औरंगाबाद: ९४.९७%
मुंबई: ९०.९१%
कोल्हापूर: ९६.०७%
अमरावती: ९६.३४ %
नाशिक: ९५.०३%
लातूर: ९५.२५%
कोकण: ९७.२१%
बारावीचा निकाल कोठे पाहायचा?
- www.mahresult.nic.in
- www.hscresult.mkcl.org
- https://hsc.mahresults.org.in